भजनी मालिका
← भजनांकडे परत

विसावा विश्वाचा जो प्राण जीवाचा । तोचि नित्य वाचा जपों आम्ही

visava vishvacha jo pran jivacha | tochi nitya vacha japon amhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विसावा विश्वाचा जो प्राण जीवाचा । तोचि नित्य वाचा जपों आम्ही ॥१॥ गोविंद वामन भावयुक्त भजन । सर्व जनार्दन हाचि भाव ॥२॥ चैतन्य अचिंत्य नाम हेंचि सत्य । नित्यता कृतार्थ विठठलनामें ॥३॥ नामा म्हणे उद्धरण आणिक नाठवे । केशवचि सवें पुरे आम्हां ॥४॥