भजनी मालिका
← भजनांकडे परत

विनविति संत आणिक सज्जन । नव्हे समाधान कांहीं केल्या

vinaviti sant anik sajjan | navhe samadhan kanhin kelya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विनविति संत आणिक सज्जन । नव्हे समाधान कांहीं केल्या ॥१॥ नानाचि प्रकार करितसे घोर । कांहीं केल्या स्थिर चित्त नव्हे ॥२॥ काय पाहावें याला विरक्त पुरुषाला । स्वरुपीं मिळाला ज्ञानदेव ॥३॥ नामा म्हणे यांचें उचंबळलें प्रेम । म्हणोनि परब्रह्म मागें पुढें ॥४॥