भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेणू वाहूनि चित्त दुहिलें । रूप देऊनि मज मनें मोहि यलें

venu vahuni chitta duhilen | rup deuni maj manen mohi yalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेणू वाहूनि चित्त दुहिलें । रूप देऊनि मज मनें मोहि यलें ॥१॥ वेधु वेधकू गोपाळ लाघवी । जीवा लवियली आवडी नित्य नवी ॥२॥ दृष्टीपुढें माझें ध्यान ठेवियेलें । वृत्तिसहित मन तेथें माझें गोविलें ॥३॥ शुद्ध शामकमळदळ लोचनु । पावा वाजवि-तसे देहुडा रुणझुणीं ॥४॥ तया प्रभा दिसती दिशा निर्मळ । कृष्ण पाहतां मन झालें व्याकुळ ॥५॥ नामया स्वामीचें अनुपम्य रूपडें । पाहतां मन फिरलें माघारें ॥६॥