भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदाचें महिमान जनीं जनार्दन । आणिक वचन तेथें नाहीं

vedachen mahiman janin janardan | anik vachan tethen nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेदाचें महिमान जनीं जनार्दन । आणिक वचन तेथें नाहीं ॥१॥ भूतीं दया धरा भक्तिभाव करा । हरिहरां वेद सांगे ॥२॥ सर्व हेंचि सार ब्रह्ममय खरें । आणिक दुसरें न दिसे आम्हां ॥३॥ नामा म्हणे समर्थ वेद तो आमुचा । सांगे नित्य जपा रामकृष्ण ॥४॥