भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेद गणितां मर्यादला

ved ganitan maryadala

रचनाकार: संत कान्हो · अभंग
वेद गणितां मर्यादला । तरि तूं अगाध बा विठ्ठला ॥१॥ येवढें माप कैचें थोर । ज्याणें उमाणे तुमचा पार ॥धृ॥ शेष वर्णितां श्रमला । जिव्हा दुखंड होउनि ठेला ||३|| म्हणौनि कान्हो पाठक उगा । मौनें मवी पांडुरंगा ।।४।।