भजनी मालिका
← भजनांकडे परत

वटेश्वरें वृत्तान्त सांगितला सकळ । पूर्वीं आमुचें स्थळ याच क्षेत्रीं

vateshvaren vruttanta sangitala sakal | purvin amuchen sthal yach kshetrin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वटेश्वरें वृत्तान्त सांगितला सकळ । पूर्वीं आमुचें स्थळ याच क्षेत्रीं ॥१॥ येथूनियां वाट जातसे पाताळा । उघडिली शिळा समाधीची ॥२॥ आसन मनोहर मृगछालावर । पहाती ऋषीश्वर आनंदानें ॥३॥ सोपान वटेश्वर करिती एकांत । कळलें मनोगत नामा म्हणे ॥४॥