भजनी मालिका
← भजनांकडे परत

वटारोनि डोळे पाहती आकाश । मज त्याचा भासा कळों नेदी

vataroni dole pahati akash | maj tyacha bhasa kalon nedi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वटारोनि डोळे पाहती आकाश । मज त्याचा भासा कळों नेदी ॥१॥ भाजा भाजा म्हणोनि उठली एकसरांज । मग म्यां बाहेरां गमन केलें ॥२॥ आतां यांजवरी द्याल त्यांचे हातीं । होऊं पाहाती माती जीवित्वाची ॥३॥ अभयाचें दान द्यावें बा श्रीहरी । दुर्बळ बाहेरी घालूं नये ॥४॥ समर्था लांच्छान लागतें नांवाचें । न जाणों देवाचें असेल कांहीं ॥५॥ नामा म्हणे नांव पतितपावन । तेया बोला उणें आणूं नये ॥६॥