भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसंताचा दिवस

uttam ha chaitramas | rutu vasantacha divas

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसंताचा दिवस ॥१॥ शुक्ल-पक्षीं ही नवमी । उभे सुरवर ते व्योमीं ॥२॥ माध्यान्हीसी दीनकर । पळभरी होय स्थिर ॥३॥ धन्य मीच त्रिभुवनीं । माझे वंशीं चक्रपाणी ॥४॥ सुशोभित दाही दिशा । आनंद नरनारी शेषा ॥५॥ नाहीं कौ-सत्येस्री भान । गर्भीं आले नारायण ॥६॥ अयोनीं संभव । प्रगटला हा राघव ॥७॥ नामा ह्मणे डोळं । पाहीन भुवनत्रयपाळा ॥८॥