भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठोनियां प्रात:काळीं । देवें मुरली वाजविली

uthoniyan prat:kalin | deven murali vajavili

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उठोनियां प्रात:काळीं । देवें मुरली वाजविली ॥१॥ गडी मिळोनी समस्त । घ्यारे शिदोर्‍या सांगात ॥२॥ अलंकार घालिताती दिसे सुशोभित मूर्ति ॥३॥ नामा ह्मणे स्वामी माझा । आला भक्तांचिये काजा ॥४॥