भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदित कमळें नानावर्ण सुंदर । फुलले तरुवर नानारूपें

udit kamalen nanavarna sundar | phulale taruvar nanarupen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उदित कमळें नानावर्ण सुंदर । फुलले तरुवर नानारूपें ॥१॥ श्वेतपीतरक्त भ्रमर रुणझुण । होताती श्रवण वैष्णवांसी ॥२॥ गुंजाराव भ्रमती रत्नकीळा फांकती । मनोहर दिसती सुरवरांला ॥३॥ तरुवर गगनीं अंकृरले भारी । विजा तैं कोंदल्या बहुतांपरी ॥४॥ गंधर्व गायनें आलापित सुस्वरीं । केलें स्पष्ट नयनीं गुह्म गौप्य ॥५॥ नामा म्हणे देवा मन जालें स्थिर । पडियेला विसर अविद्येचा ॥६॥