भजनी मालिका
← भजनांकडे परत

उद्धिग्न मनीं करी दीर्घ ध्वनी । नाहीं माझें कोणी सखे ऐसें

uddhigna manin kari dirgha dhvani | nahin majhen koni sakhe aisen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उद्धिग्न मनीं करी दीर्घ ध्वनी । नाहीं माझें कोणी सखे ऐसें ॥१॥ वैराग्य कसवटी सोसवेना घाये । पळावया पाये मार्ग काढी ॥२॥ जाले चाळाचूळ मनांत चंचळ । युगा ऐसें पळ वाटतसे ॥३॥ नामा म्हणे जावें पळोनियां आतां । संतसंग होतां भाजतील ॥४॥ म्हणे मुक्ताबाई चैतन्याचा केर । ब्रह्म अग्नीवर चेतवावा ॥५॥