भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदार चक्रवर्ती लक्ष्मीचा पती । तरी कां काकुळती चित्तीं वाहासी

udar chakravarti lakshmicha pati | tari kan kakulati chittin vahasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उदार चक्रवर्ती लक्ष्मीचा पती । तरी कां काकुळती चित्तीं वाहासी ॥१॥ आम्हां दुर्बंळाचें ठेवणें कां ठेविलें । दिवाळें निघाळें काय तुझें ॥२॥ ज्याचें घेसी त्याचें ऐसेंचि करिसी । तें न चले वजपाशीं केशीराजा ॥३॥ चौघाचारीं तुज वेढीन आतां । मग बैसेल माथां अपकींर्ति ॥४॥ अठराही बोलती साही सत्य वाचा । उदारठायींचा कां न होसी ॥५॥ देणें घेणें तुज न सुटेथा । विचाररूनि आतां म्हणहें मनीं ॥६॥ नामयाचें ठेवणें तुजजवळीं आहे । न सोडीं-तुझें पाय म्हणे विठा ॥७॥