भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभा विटेवरी भक्तांचा कैवारी । भेटावया उभारी दोन्हीं बाह्या

ubha vitevari bhaktancha kaivari | bhetavaya ubhari donhin bahya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उभा विटेवरी भक्तांचा कैवारी । भेटावया उभारी दोन्हीं बाह्या ॥१॥ गुण दोष त्याचे न पाहेची डोळां । भेटे वेळो-वेळां केशिराज ॥२॥ ऐसा दयावंत घेतो समाचारु । लहान आणि थोर सांभाळितो ॥३॥ सर्वांलागीं देतो समान दर्शन । उभा तो आपण समपायीं ॥४॥ गना ह्मणे तया भक्तांची आवडी । भेटा-वया कडाडी उभा ठेला ॥५॥