भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हीं वेदरुप भूदेव प्रत्यक्ष । दरुषणेंचि मोक्ष जडमूढा

tumhin vedarup bhudev pratyaksha | darushanenchi moksha jadamudha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुम्हीं वेदरुप भूदेव प्रत्यक्ष । दरुषणेंचि मोक्ष जडमूढा ॥१॥ सकळही तीर्थें तुमच्या वसती पायीं । तेथें आमुचे कायीं उरती दोष ॥२॥ धन्य दिवस आजी जालों कृतकृय । भेटलेती संतब्रह्मवृंद आम्हां ॥३॥ ज्ञानदेवा ध्यान ब्राह्मणाचे चरण । कलिमलछेदन निवृत्ति म्हणे ॥४॥