भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुळसीवृंदावन दर्शन । त्यासी वैकुंठीं गमन । लटिकें ह्मणे कोण । त्यासी आण केशवाची

tulasivrundavan darshan | tyasi vaikunthin gaman | latiken hmane kon | tyasi an keshavachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुळसीवृंदावन दर्शन । त्यासी वैकुंठीं गमन । लटिकें ह्मणे कोण । त्यासी आण केशवाची ॥१॥ तुळसीमाळा घाली गळां । त्या भेटे घनसांवळा । चतुर्भुज सहित कमळा । केशिराज प्रत्यक्ष ॥२॥ तुळसीरोपा घाली उदक । त्याचे हरती महादोष । ब्रह्मादिकां न कळे नि:शेष । जन्ममरण त्या नाहीं ॥३॥ तुळसीची देवा बहु प्रीति । आणिक पुष्पें न लागती । नामा म्हणे जी श्रीपति । हेचि भक्ति द्यावी मज ॥४॥