भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझ्या पायीं चित्त रंगलेसें माझें । नाहीं केशिराजें ऐसें केलें

tujhya payin chitta rangalesen majhen | nahin keshirajen aisen kelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझ्या पायीं चित्त रंगलेसें माझें । नाहीं केशिराजें ऐसें केलें ॥१॥ उठवितां काय होईल संतोष । मज अभाग्यास मोकलीलें ॥२॥ प्रपंच कावाडी न घाली मज दृढ । नको वाडें कोड झणीं देवा ॥३॥ नामा म्हणे भावें विनंति समस्तां । नको भंगू आतां प्रेमपान्हा ॥४॥