भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझ्या निजरूपाकारणें । वेडावलीं षड्‌दर्शनें

tujhya nijarupakaranen | vedavalin shad‌darshanen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझ्या निजरूपाकारणें । वेडावलीं षड्‌दर्शनें ॥१॥ परि सोय न कळे त्यांसी । समीप असतां देवासीं ॥२॥ चारीश्रमें हो कष्टती । वेदशास्त्रें धुंडाळिती ॥३॥ परि कवणें रीति तुला । न जाणवे जी विठ्ठला ॥४॥ तुझी कृपा होय जरी । दासी जनी ध्रुपद करी ॥५॥