भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे पाय माझिया गळ्यासी । करीन एक मग उगलाची देसी

tujhe pay majhiya galyasi | karin ek mag ugalachi desi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझे पाय माझिया गळ्यासी । करीन एक मग उगलाची देसी ॥१॥ आपुलें मागतां झणें धिक्कारिसी । चोरासी सांगसी निजगुज ॥२॥ सांपडलीया लाथ बुक्की साहावी । जीवीं धूर धरावी विठो ऐसी ॥३॥ मग होणार तें हो या शरीरा । सांपडलीया परा जीवें भावें ॥४॥ धुरेसी झगडा करावा सैरा । या रांडपोरां खवळसी काय ॥५॥ केशव म्हणे विठा झुंजार तूं भला । खेचरू दाखविला ठेवा तुझ्या बापाचा ॥६॥