भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे कीर्तना कोण जाय आतां । सख्या भगवंता कृपा करीं

tujhe kirtana kon jay atan | sakhya bhagavanta krupa karin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझे कीर्तना कोण जाय आतां । सख्या भगवंता कृपा करीं ॥१॥ भीष्म पहुडला शरांचे पंजरी । तया प्रश्र करी युधिष्ठिर ॥२॥ महाभयेश्वरी विघ्नें निवारिता । सकळां देखतां दांत पाडी ॥३॥ नामा म्हणे तुझी भक्ति अघटित । पवाडे अनंत दाविना कां ॥४॥