भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा नामा तुज व्हावा जन्मोजन्मीं । काय यासी आम्ही करूं शकों

tujha nama tuj vhava janmojanmin | kay yasi amhi karun shakon

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझा नामा तुज व्हावा जन्मोजन्मीं । काय यासी आम्ही करूं शकों ॥१॥ मर्यादाअ सांडोनि बोलसी कठिण । करिसी वायांविण इष्ट तुटी ॥२॥ ऐसें कांहीं सुखा अनुपम्य दाखवीं । जया ओळखी जीवीं निजरूपाअ ॥३॥ जेणें लोभें त्याचेंज मन मागें मोहरे । वृत्तिसहित विरे ठाईं ॥४॥ तेणें या जन्माचे विसरोनि संताप । सोय आपेंआप धरिल तुझी ॥५॥ जरी तूं देखतीस स्वहित पूर्वीं याचें । तरी कां चित्त त्याचें त्रास घेतें ॥६॥ संसार करितां कांहीं न देखेचि सुख । म्हणोनि विन्मुख जाला तुज ॥७॥ वरपंगाचें पेहें पाजिसिल काय । हा निजमुखीं धाय ऐसें करी ॥८॥ तरीच तूं निजाची लोभापर माता । म्हणोनि श्लघ्यता जगामाजीं ॥९॥ आतां असो सहज येणेंविण काय काज । मी बोलिलों तुज कळेल तें करीं ॥१०॥ नामा म्हणे देवा ऐसें काय केलें । काय तुजवेगळें जीवन माझें ॥११॥