भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा माझा देवा कां रे वैराकार । दुःखाचे डोंगर दाखविशी

tujha majha deva kan re vairakar | duhkhache dongar dakhavishi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझा माझा देवा कां रे वैराकार । दुःखाचे डोंगर दाखविशी ॥१॥ बळें बांधोनियां देसी काळा हातीं । ऐसें काय चित्तीं आलें तुझ्या ॥२॥ आम्हीं देवा तुझी केली होती आशा । बरवें ह्रषिकेशा कळों आलें ॥३॥ नामा म्हणे देवा करा माझी कींव । नाहीं तरी जीव घ्यावा माझा ॥४॥