भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजविण आम्हां कोण हो पोषिता । अहो जी कृपावंता पंढरिराया

tujavin amhan kon ho poshita | aho ji krupavanta pandhariraya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुजविण आम्हां कोण हो पोषिता । अहो जी कृपावंता पंढरिराया ॥१॥ न करीं विठ्ठला आतां लाजिरवाणें । मी तुझें पोसणें पांडुरंगा ॥२॥ काकुळती कोणा येऊं हो मी आतां । अनाथाचे नाथा विठ्ठला तूं ॥३॥ एक वेळ आतां पाहे मजकडे । नामा म्हणे वेडें रंक तुझें ॥४॥