भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजवांचोनियां वैकुंठनायका । आह्मांसी घटिका युग होय

tujavanchoniyan vaikunthanayaka | ahmansi ghatika yug hoy

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुजवांचोनियां वैकुंठनायका । आह्मांसी घटिका युग होय ॥१॥ अस्तमान होतां येसी तूं गोकुळीं । मुखावरी धुळी गोर-जांची ॥२॥ कुरळ हे केंश सुंदर नासिक । पाहोनियां सुख फार होये ॥३॥ लवती पांपण्या न सोसती आह्मां । अहिर्निशी नामा हेंचि गाय ॥४॥