भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज विकोनी घातली वोर । मज बोलतोसी

tuj vikoni ghatali vor | maj bolatosi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुज विकोनी घातली वोर । मज बोलतोसी ॥१॥ उच्छिष्ठ शिदोरी घेऊनिया करीं । भक्तांचा भिकारी तूंचि एक ॥२॥ चोर आणि शिंदळू चाळविलें गोविळें । अनंत मर्दिले दुष्टकाळ ॥३॥ नामा म्हणे केशवा सांगेन वर्म । ऐकतां न राहे संतांचें कर्म ॥४॥