भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेथोनि वैष्णव आले नेवाशासी । सहसमुदायेंसी देवराव

tethoni vaishnav ale nevashasi | sahasamudayensi devarav

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तेथोनि वैष्णव आले नेवाशासी । सहसमुदायेंसी देवराव ॥१॥ म्हाळसेलागीं पूजा केली असे निगुतीं । राहिले दहा रात्रीं ह्रषिकेशी ॥२॥ येथोनि चलावें पुढती शारंगधरा । जावें टोकेश्वरा स्नानालागीं ॥३॥ चहूं युगा आदि स्थळ पुरातन । आले नारायण गोदातीरीं ॥४॥ नामा म्हणे येथें रहावें ह्रषिकेशी । विजयादशमीशीं सिद्ध होऊं ॥५॥