भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेज स्पर्शें ज्योती कर्पुरीं निघाली । दोन्ही तीं निमालीं एकदांची

tej sparshen jyoti karpurin nighali | donhi tin nimalin ekadanchi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तेज स्पर्शें ज्योती कर्पुरीं निघाली । दोन्ही तीं निमालीं एकदांची ॥१॥ आघातानें नाद घंटेतून उठे । शेवटीं तो मिटे घंटेमाजीं ॥२॥ ब्रह्मीं माया स्फुरे चैतन्यप्रकाशें । शेवटीं तें वसे ब्रह्मरूपीं ॥३॥ पांडुरंग म्हणे ऐक नाम्या ज्ञान । वाटो समाधान तुझ्य जीवा ॥४॥