भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेचि भक्तिभावें पतीपुढें ठेवी । पाहोनी गौरवी ब्रम्हनिष्ठा

techi bhaktibhaven patipudhen thevi | pahoni gauravi bramhanishtha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तेचि भक्तिभावें पतीपुढें ठेवी । पाहोनी गौरवी ब्रम्हनिष्ठा ॥१॥ तया योग्य नव्हेचि गे हा पदार्थ । आमुचिया आर्त तुळसीदळ ॥२॥ द्रौपदीच्यासाठीं भाजीपान खाये । तेणें त्याची काय भूक गेली ॥३॥ नामा म्हणे हें तो कोड कौतुक । थोडेंहि अधिक देव करी ॥४॥