भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव ते आवडते भक्त अंतरंग आपुले । देवं बोलाविलें एकांतासी

tanv te avadate bhakta antarang apule | devan bolavilen ekantasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव ते आवडते भक्त अंतरंग आपुले । देवं बोलाविलें एकांतासी ॥१॥ म्हणे ह्या नाम्यापरतें मज दुजें नावडे । सांगे तयापुढें केशीराजु ॥२॥ त्या देखतांची दृष्टी मन माझें निवे । वाटे त्या घालावें हदयामाजीं ॥३॥ त्याचेनि लोभें मन माझें मोहिलें । अखंड राहिलें त्याचेपाशीं ॥४॥ मजपरतें दुर्जे नेणें तो नामा । नित्य माझा प्रेमा पढिये त्यासी ॥५॥ मी भक्तकाजकैवारी म्हणवितां वाटे लाज । परि म्यां कांही काज केलें त्यांचे ॥६॥ धर्म अर्थ काम त्या नाहीं दिधले । जन्मोनि बांधलें सेवाऋणें ॥७॥ तेणें आपुलेनि पुरुषार्थे जिंकिला संसार । केला मदमत्सर देशधडी ॥८॥ लोभ दंभ दुरल माया मोह वैरी । घातलें तोडरीं कामक्रोध ॥९॥ तो न मनीं आणिका देवा न करी त्यांची सेवा । मजपरता विसांवा नाहीं त्यासी ॥१०॥ तें मार्गीम शिणलें असेल कोमाईलें । सुखदुःख आपुलें सांगेल कवणा ॥११॥ त्याचिया जीवींचे मीच जाणे सर्व । हा माझा अनुभव आहे त्यासी ॥१२॥ तें माझें दास आवडतें अंतरंग । त्यजिला सर्वसंग मजसाठीं ॥१३॥ देखोनी ते आवडी अभिन्नव वाटलें । सप्रेमें दाटले सकळ भक्त ॥१४॥ परसा भागवत आनंदे नाचत । लोटांगणीं येत गरुडपारीं ॥१५॥