भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव अध्यात्मिक पंडित अग्निहोत्री । एक म्हणविती श्रीत्री सदाचार

tanv adhyatmik pandit agnihotri | ek mhanaviti shritri sadachar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव अध्यात्मिक पंडित अग्निहोत्री । एक म्हणविती श्रीत्री सदाचार ॥१॥ आम्हांसी तें नाहीं तुमचें स्वरुपज्ञान । अपूर्व दर्शन देखिलें आजी ॥२॥ सुखाचेम पारणें करविलें या रुपें । तेणें त्रिविधताप निवारले ॥३॥ कवण वृत्ति काय चालविजे व्यापार । योजिलें बिढार कवणें ठायीम ॥४॥ आजिचें निमित्त काय उपस्थित । ऐकोनि पंढरीनाथ बोलते जाले ॥५॥ माझी कुळवृत्ति हरिदासां ठाउकी । मज यासी ओळखी निकट असे ॥६॥ मज असंगा संगु सर्वकाळीम याचा । अनंत जन्मांचा ऋणानुबंध ॥७॥ साक्ष तुमचे चरणा करुनि बोले वाचा । मी मैत्र नामयाचा अंतरंगु ॥८॥ करोनियाम स्नानविधी यावें शीघ्रवत । करावें सनाथ कृपादृष्टीं ॥९॥ बिढार तरी असे राउळ्भीतरीं । नांव सांगों तरी अनंत जाणा ॥१०॥ जीवींचें गुजगौप्य संतांसी पुसावें । निःसंदेह यावें भोजनासी ॥११॥ ऐसी ते अमृतवाणी ऐकोनि श्रवणीं । आनंदले मनीं भूदेव ते ॥१२॥ आज्ञा देती देवा जावें निजमंदिरा । शीघ्रवत करा पाकसिद्धी ॥१३॥ मग रुक्माईसी सांगे सकळ विवंचना । प्रार्थिले ब्राह्मणां सकळिकांसी ॥१४॥ कर्मठ अभिमानी नोळखती मज । देखिनियां चोज वाटे त्यांसी ॥१५॥ कुळवृत्ति नाम पुशिलें मज तिहीं । सांगितलें म्यांही सर्व त्यांसी ॥१६॥ सांगाती संतांचा मी मैत्र नामयाचा । अनंत जन्मांचा निकट म्हणोनी ॥१७॥ बिढार तरी असे राउळभीतरीं । सांगे खूण परी न कळे त्यांसी ॥१८॥ नाम तरी अनंत दाविला संकेत । परी नेघे त्यांचें चित्त आठवण ॥१९॥ तंव ते विश्वमाता म्हणे जी कृपानिधी । सदा भेदबुद्धि त्यांचे ठायीं ॥२०॥ विद्या वयसा जाती कुळाचा अभिमान । त्या कैचे चरन प्राप्त तुमचे ॥२१॥ उदार चक्रवतीं भक्तांचा विसावा । त्याच्या निजभावा वेळाईतु ॥२२॥ तो भाग्यें जोडला वैकुंठीचा ठेवा । उजरीं जाली दैवा नामयाच्या ॥२३॥