भजनी मालिका
← भजनांकडे परत

टाळ विणे मृदंग सुस्वर गायन । कोंदलें गगन दाही दिशा

tal vine mrudang susvar gayan | kondalen gagan dahi disha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
टाळ विणे मृदंग सुस्वर गायन । कोंदलें गगन दाही दिशा ॥१॥ प्रळयींच्याअ विजा वर्षती अपार । जाला धुंधकार दाही दिशा ॥२॥ करोनियां स्नान वैसले बाहेर । म्हणती अंधकार फार जाला ॥३॥ झंझाट सुटला वारा कापूं लागे धरा । नभचि अंतरा कालवलें ॥४॥ नामा म्हणे देवा जाली कैसी गती । पडलीसे भ्रांति अवघ्या जनां ॥५॥