भजनी मालिका
← भजनांकडे परत

टाळ दिंडी हातीं उभा महाद्वारीं । नामा कीर्तन करी पंढरिये

tal dindi hatin ubha mahadvarin | nama kirtan kari pandhariye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
टाळ दिंडी हातीं उभा महाद्वारीं । नामा कीर्तन करी पंढरिये ॥१॥ आवडीचेनि सुखें वोसंडतु प्रेमें । गातों मनोधर्में हरिचे गुण ॥२॥ सांडोनि अभिमान नाचे धरोनि कान । अंतरीं ध्यान विठोवाचें ॥३॥ श्रीहरिची उत्तम जन्मकर्मनामें । घेतलीं त्या प्रेमें सुखरूपें ॥४॥ संतांची विश्रांति ज्ञानियांचें गुज । जें कां मुक्तिबीज मोक्षदानी ॥५॥ गोवर्धनधरे गोपीमनोहरे । भक्तकरुणाकरे पांडुरंगा ॥७॥ सकळा मंगळनिधी पातकभंजना । हरिजगज्जीवना परमानंदा ॥८॥ तूंचि एक सकळ आदिमध्यअंतीं । नित्य सुखसंपत्ति सज्जनांची ॥९॥ तूंचि माझा श्रोता तूंचि माझा वक्ता । तूंचि घेता देता प्रेमसुख ॥१०॥ विष्णुदास नामा विनवी पुरुषोत्तमा । सोडवी भवभ्रमां पासूनियां ॥११॥