भजनी मालिका
← भजनांकडे परत

टाकियेलें आम्हीं पतिबंधुसूतां । आलोंत अच्युता तुजपाशीं

takiyelen amhin patibandhusutan | alont achyuta tujapashin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
टाकियेलें आम्हीं पतिबंधुसूतां । आलोंत अच्युता तुजपाशीं ॥१॥ आमुची ही इच्छा करिशील पूर्ण । आहेसी कठीण ठावें नाहीं ॥२॥ घालोनियां कूपीं कापियेला दोरा । साधियेलें वैरा आपुलिया ॥३॥ वरोनियां टाकी मोठासा पर्वत । म्हणती समस्त नामा म्हणे ॥४॥