भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वर्ग मृत्यु पाताळ तिन्हीं ताळे उदर । विराटले थोर विश्वरुप

svarga mrutyu patal tinhin tale udar | viratale thor vishvarup

रचनाकार: संत नामदेव · अभंग
स्वर्ग मृत्यु पाताळ तिन्हीं ताळे उदर । विराटले थोर विश्वरुप ॥१॥ समाधिसंजीवन निवृत्ती फावले । तें निधान देखिलें आम्ही तुम्ही ॥२॥ निवृत्ति सोपान ज्ञानदेव निधी । मुक्ताई सिद्धि आळंकापुरीं ॥३॥ पंढरी प्रत्यक्ष केली ज्ञानदेवें । उभारुनि बाहे सांगे आम्हां ॥४॥ कळिकाळासीं त्रास विठठल उच्चारीं । हरी चराचरी भरला असे ॥५॥ सर्वत्र सबाह्य अंतरंग रुपडें । तें रुप फाडोवाडें पारखिलें ॥६॥ चिंतामणीचें सार कल्पतरु उघड । दावुनियां मूढ तारियेले ॥७॥ सुवर्णाचा पिंपळ तिहीं केला ठाऊका । त्या समीप देखा कल्पतरु ॥८॥ सिद्धेस्व्हरलिंग सिद्धिबुद्धि दाता । जड जीवा मुक्तता देतु हरी ॥९॥ ऐसिये स्थानकीं ज्ञानदेव राहिले । राहुनी तारिले मूढजन ॥१०॥ नामा म्हणे ज्ञानदेव हा दातार । जडजीवाम उद्धार विठठल हरी ॥११॥