भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वानंदें देवभक्तां भेटी । वोरसोनि कंठीं आलिंगावें

svananden devabhaktan bheti | vorasoni kanthin alingaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
स्वानंदें देवभक्तां भेटी । वोरसोनि कंठीं आलिंगावें ॥१॥ देव म्हणे भले आठवलें तुज । ते हे संधी मज कळली असे ॥२॥ पदपदांतरें केला मार्ग सोपा । त्यांत माझी कृपा वोळली असे ॥३॥ देव म्हणे तुझी पुरवीन आळी । सुखी सही मंडळी वैष्णवांची ॥४॥ नामा म्हणे देवा आज्ञा देगा यासी । नेणूं काय आम्हांसी आरंभिलें ॥५॥