भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वानंदांत पडोनियां जाती । न संडी वासना चघळित हस्ती

svanandant padoniyan jati | na sandi vasana chaghalit hasti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
स्वानंदांत पडोनियां जाती । न संडी वासना चघळित हस्ती ॥१॥ तैसें माझें मन मुरारी । वासना धांवे विषयावरी ॥२॥ डोळियांचीं बुबुळें फुटोनियां जाती । न संडी वासना हालवितो पातीं ॥३॥ ढोराचें पुच्छ मोडोनियं चांगा । पुढती पुढती हालविती पैं गा ॥४॥ वोढाळ ढोरा बांधियेलें काष्ट । पुढती पुढती धरी तीच वाट ॥५॥ नामा म्हणे माझी मुळीं वासनाच खोटी । खेचर विसा चरणीं घातलिले मिठी ॥६॥ १३८) सूर्याचा प्रकाश सर्व सृष्टीवरी । धन्य तो अंतरीं सर्वकाळ ॥१॥ स्वर्गादि पाताळ सर्व पूर्ण जळें । चातका न मिळे मेघाविण ॥२॥ नारायय्न पूर्ण सर्वभूतां ठायीं । अभाग्यासी नाहीं तिहीं लोकीं ॥३॥ नामा म्हणे गुरुकृपेचें अंजन । पायाळासी धन दिसें जैसें ॥४॥