भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वामी माझा ब्रह्मचारी

svami majha brahmachari

रचनाकार: संत रामदास · अभंग
स्वामी माझा ब्रह्मचारी । मातेसमान अवघ्या नारी उपजतांबाळपणीं । गिळूं पाहे वासरमणि आंगीं शेंदुराची उटी । स्वयंभ सोन्याची कांसोटी कानीं कुंडलें झळकती । मुक्तमाळा विराजती स्वामीकृपेची साउली । रामदासाची माउली।।