भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचे सोयरे भेटती अंतरीं । बाहेरी भितरीं दिधलें क्षेम

sukhache soyare bhetati antarin | baheri bhitarin didhalen kshem

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुखाचे सोयरे भेटती अंतरीं । बाहेरी भितरीं दिधलें क्षेम ॥१॥ सुखाची गवसणी घालोनियां मना । विठ्ठलीं वासना बोल्हावली ॥२॥ वाचे उपरम मन जालें तन्मय । लागलासे लय पर लक्षीं ॥३॥ शांति क्षमा दया देती आलिंगन । चित्त समाधान पावविलें ॥४॥ परतलिया दृष्टी इंद्रियांच्या वृत्ती । पावली विश्रांति ठाईंच्या ठाईं ॥५॥ विष्णुदास नामा निजबोधें निवाला । खेचरें दिधला अभयकर ॥६॥