भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्नान संध्या टिळेमाळा । पोटी क्रोधाचा उमाळा

snan sandhya tilemala | poti krodhacha umala

रचनाकार: संत रामदास · अभंग
स्नान संध्या टिळेमाळा । पोटी क्रोधाचा उमाळा ।। ऐसे कैसें रे सोवळें। । शिवतां होतसे ओवळें ।। नित्य दांडितां हा देहो परि फिटेना संदेहो ।। बाह्य केली झळफळ । देहबुध्दीचा विटाळ ।। नित्यनेम खटाटोप ।मनीं विषयाचा जप ।। रामदासी द्रुढ भाव । तेणेविण सर्व वाव ।।