भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिंपियाचें कुळीं जन्म माझा जाला । परि हेतु गुंतला सदाशिवीं

simpiyachen kulin janma majha jala | pari hetu guntala sadashivin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सिंपियाचें कुळीं जन्म माझा जाला । परि हेतु गुंतला सदाशिवीं ॥१॥ रात्रिमाजीं सिवी दिवसामाजी सिवि । आराणूक जीवीं नोव्हे कदा ॥२॥ सुई आणि सुतळी कात्री गज दोरा । मांडिला पसारा सदाशिवीं ॥३॥ नामा म्हणे सिवीं विठोबाची अंगीं । म्हणोनियां जगीं धन्य जालों ॥४॥