भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुकादिक ज्याची वर्णिताती कीर्ति । तो ये काकुळती उद्धवासीं

shukadik jyachi varnitati kirti | to ye kakulati uddhavasin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शुकादिक ज्याची वर्णिताती कीर्ति । तो ये काकुळती उद्धवासीं ॥१॥ दयेचा सामर बोले तयेवेळां । मजसाठी गोकुळा तुवां जावें ॥२॥ मजवरी त्यांनी ठेवियेला प्राण । संसाराचे भान नाही कोणा ॥३॥ यशोदा आणि नंद झालेती तटस्थ । गडी माझे समस्त पिसे झाले ॥४॥ गाई मजविण न वेती तृण । बाळें स्तनपान विसरली ॥५॥ चालतांना पंथ चुकती नारीमर । पक्ष्यांनी आहार सांडियेला ॥६॥ शाहाणा चतूर आहेशी नेटका । बोधाव्या गोपिका ब्रह्मज्ञानें ॥७॥ नाना ह्मणे ठेवीं चरणांवरी माथा । जुंपूनियाम रथा निघतसे ॥८॥