भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुद्ध भावार्थचे पाहोनियां पाहे । आनंदला भाव योगियाचा

shuddha bhavarthache pahoniyan pahe | anandala bhav yogiyacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शुद्ध भावार्थचे पाहोनियां पाहे । आनंदला भाव योगियाचा ॥१॥ म्हणे आतां भेटूं बाळमित्न हरि । भक्ताचा कैवारी । कृष्णनाथ ॥२॥ बांधावया वस्त्र केवळ जर्जर । त्यामाजी न थरे गुंडळितां ॥३॥ नामा म्हणे द्विज आनंद पावला । मुहूर्त नेमियेला प्रयाणासी ॥४॥