भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रोते ह्मणती विष्णुदासा । या ब्रह्मांडींचा प्रळय कैसा । पंढरीच्या भास । नाश कीं नाहीं

shrote hmanati vishnudasa | ya brahmandincha pralay kaisa | pandharichya bhas | nash kin nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
श्रोते ह्मणती विष्णुदासा । या ब्रह्मांडींचा प्रळय कैसा । पंढरीच्या भास । नाश कीं नाहीं ॥१॥ तंव नामा ह्मणे सुदर्शना-वरी । देवें रचिली पंढरी । भक्तांसहित राज्य करी । रुक्मिणीवर ॥२॥ तो परमात्मा गुणातीत । अपरोक्ष भक्तांसहित । तेथें प्र-ळय हात जोडित । जयालागीं ॥३॥ जें ब्रह्मयाचें आयुष्य सारें । तें लया जाय चराचरें । तें पंढरपूर । मिळे वस्तु माझी ॥४॥ नामा ह्मणे या खुणा । कळती संतजना । इतर मायिक जना । नेणवती ॥५॥