भजनी मालिका
← भजनांकडे परत

शेषयायी हरी उठोनि लवकरी । ह्मने सख्या धरीं मनुष्यरूप

sheshayayi hari uthoni lavakari | hmane sakhya dharin manushyarup

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शेषयायी हरी उठोनि लवकरी । ह्मने सख्या धरीं मनुष्यरूप ॥१॥ तुजविण मज न गमे घटिका । म्हणोनि नेटका रूप धरीं ॥२॥ देवकी उदरा जाऊनि रिघावें । अंतरीं वसावें रोहिणीच्या ॥३॥ तुझियेचि सेवें येतों मी माघारा । नामया दातारा कळों आलें ॥४॥