भजनी मालिका
← भजनांकडे परत

शास्त्राचेम हें सार वेदाचें गव्हर । उतरावया पार आणिक नाहीं

shastrachem hen sar vedachen gavhar | utaravaya par anik nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शास्त्राचेम हें सार वेदाचें गव्हर । उतरावया पार आणिक नाहीं ॥१॥ विठठल विठठल म्हणा उघडा मंत्र जाणा । कळिकाळ अंकणा होईल तुम्हां ॥२॥ न करावें खंडन खंडन उच्चारण । तप अनुष्ठान न लगे तुम्हां ॥३॥ सिद्धीचे हें सार मुक्तीचें माहेर । उतरावया पार दुजें नाहीं ॥४॥ विठठलापरतें काय करीसी दैवत । परब्रह्म निरुतें पंढरीये ॥५॥ सिद्धीचें सहज भक्तीचे हें बीज । केशवीं दिलें मज म्हणे नामा ॥६॥