भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरीराचा भाव तुज नाहीं देवा । तेथें मी केशवा काय बोलूं

shariracha bhav tuj nahin deva | tethen mi keshava kay bolun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शरीराचा भाव तुज नाहीं देवा । तेथें मी केशवा काय बोलूं ॥१॥ अंगदाचे अंगीं बळ देसी फार । बहु उपकार कळों आलें ॥२॥ तुम्हां नित्य न्याय नोव्हे साचपण । बळि तूतें दान देउनि ठके ॥३॥ नामा म्हणे सदा काय म्यां गार्‍हाणें । किती नारायणें देऊं आतां ॥४॥