भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरण जावें रामराया

sharan javen ramaraya

रचनाकार: संत रामदास · अभंग
शरण जावें रामराया । पुढती न पाविजे हे काया जीव जीवांचा आहार । विश्व होतसे काहार एक शोकें आक्रंदती । तेणें दुजे सुखी होती दास म्हणे सर्व दु:ख । रामाविण कैसे सुख।