भजनी मालिका
← भजनांकडे परत

शंकर – खंडोबा – भैरव नमो नमो सदाशिवा । गिरिजापति महादेवा

shankar – khandoba – bhairav namo namo sadashiva | girijapati mahadeva

रचनाकार: संत रामदास · अभंग
शंकर – खंडोबा – भैरव नमो नमो सदाशिवा । गिरिजापति महादेवा ।। शिरी जटेचा हा भार । गळां वासुकीचा हार ।। अंगा लावूनिया राख । मुखी रामनाम जप। ।। भक्ता प्रसन्न नानापरी । अभंयकर ठेऊनि शिरी ।। दास म्हणे शिवशंकरा । दुबळ्यावरी कृपा करा ।।