भजनी मालिका
← भजनांकडे परत

शंभु उपदेशी भवानीसी । रामनाम जपे मानसीं

shambhu upadeshi bhavanisi | ramanam jape manasin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शंभु उपदेशी भवानीसी । रामनाम जपे मानसीं ॥१॥ दोन्हीं अक्षरें रसाळें । महा पातकां करी निराळें ॥२॥ वीजमंत्र राजनाम । फळ शतकोटी रामायण ॥३॥ नामा विनवितो रघुनंदना । विनती परिसा दशरथनंदना ॥४॥