भजनी मालिका
← भजनांकडे परत

षड्‍चक्र भेदोनी जातां उर्ध्वपंथें । ध्वनि अनुहात उमटे तेथें

shad‍chakra bhedoni jatan urdhvapanthen | dhvani anuhat umate tethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
षड्‍चक्र भेदोनी जातां उर्ध्वपंथें । ध्वनि अनुहात उमटे तेथें ॥१॥ तये ध्वनीमाजी मग्न होय मन । योगसिद्धि जाण कैसी घडे ॥२॥ तेही बोलंडितां सिद्धि आडव्या येती । घेऊनियां जाती आपुल्या पंथें ॥३॥ तेथें गुंतोनियां विचरती योगीजन । योगासी साधून काय होतें ॥४॥ आधिं तो साधितां कष्टाचे संभार । होय चकनाचूर शरीराचा ॥५॥ साधितीय पुढें ऐसीं विघ्नें येती । ठेऊनि मागुती फिरती मागें ॥६॥ वारियाची मोत कैसी बांधवेल । भलत्यासी सांगतां वाटेल हें लटिकें ॥७॥ नामा ह्मणे तुम्ही सोडो-नियां भक्ति । करितां नाना युक्ति मूर्खजन ॥८॥