भजनी मालिका
← भजनांकडे परत

सात्विक हें वैराग्य अर्थाचें हें मूल । आशा हें केवळ अनर्थ जाणा

satvik hen vairagya arthachen hen mul | asha hen keval anartha jana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सात्विक हें वैराग्य अर्थाचें हें मूल । आशा हें केवळ अनर्थ जाणा ॥१॥ अंतरापासोनी नसतां विवेक । निभ्रांताचे टक आशेवरी ॥२॥ राजस तामस करोनियां गोळा । होतसे अंधळा दाटोनियां ॥३॥ नामा म्हणे ऐसे उदंड उपाय । विठोबाचे पाय अंतरती ॥४॥